Breaking News | दौंड तालुक्यातील गिरीम येथे मेंढपाळाचा खून

दौंड : दौंड तालुक्यातील गिरीम या गावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. गिरीम गावाच्या हद्दीमध्ये गुरे चरणाऱ्या एका मेंढपाळाचा निर्दयीपणे कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

हा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप समजू शकलेले नाही. मोहन तालवर (वय 45,रा. गिरीम,बेटवाडी ता.दौंड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे . दौंड पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे.

सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, मोहन तालवर हे ज्या ठिकाणी आपली गुरे चारत होते त्या ठिकाणी दुचारिवरून तीनजण त्यांच्याकडे आले. त्यांनी कॅनलजवळ आपली दुचाकी लावून ते पायी मोहन यांच्याकडे गेले त्यानंतर काही अवधीनंतर त्यांचा खून झाल्याचे लोकांना समजले. मोहन तालवर यांचा गळा चिरून आणि त्यांच्या डोक्यात हत्याराने वार करून त्यांचा खून करण्यात आला अशी प्राथमिक मिळत आहे.