शेअर मार्केटच्या नावाखाली ‛देलवडी’ येथील ‛कॉन्ट्रॅक्टर’ची 13 लाखांची फसवणूक! हडपसर आणि वाखारी येथील चौघांवर गुन्हा दाखल

पुणे / दौंड : शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे, तुम्ही पैसे गुतवा आम्ही तुम्हाला भरपूर नफा मिळवून देतो असे म्हणून देलवडी ता.दौंड येथील एका काँट्रॅक्टरची तब्बल 12 लाख 99 हजार 900 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली असून याबाबत यवत पोलीस ठाण्यात दत्तात्रय अशोक शेलार, (वय – 44 वर्षे, व्यवसाय – कंन्ट्रक्शन, रा.देलवडी, ता.दौंड, जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरून 1) वैशाली मच्छिंद्र वाघ, 2) प्रज्ञा मच्छिंद्र वाघ (दोंन्ही रा. हडपसर पुणे), 3) प्रियांका राजेंद्र शेळके, 4) राजेंद्र शेळके (पुर्ण नांव माहीत नाही दोंन्ही रा.वाखारी, ता.दौंड, जि.पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती आणि फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 31/01/2021 रोजी दुपारी 1ः30 वाचे.सूमा. फिर्यादी दत्तात्रय शेलार हे देलवडी ता.दौंड येथे त्यांच्या घरी असताना त्यांच्याकडे वैशाली मच्छिंद्र वाघ, प्रियांका राजेंद्र शेळके, राजेंद्र शेळके असे त्यांच्या घरी आले. यावेळी वैशाली वाघ ह्या फिर्यादी यांना म्हणाल्या की, माझी मुलगी प्रज्ञा हीला शेअर मार्केटमध्ये दोन कोटी रूपयांचा नफा झालेने मला राहु, पाटेठाण कारखान्याचे जवळ दोन एकर जमीन विकत घ्यायची आहे. आम्ही सर्वजण शेअर मार्केटचा बिझनेस करतो, शेअर मार्केटमध्ये खुप नफा आहे, आम्ही अमित कैलास वरटे यांनाही 60 लाख रूपयांचा नफा करून दिला आहे. तुंम्ही पण शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणुक करा आंम्ही तुंम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करून देतो असे म्हणून दत्तात्रय शेलार यांना वैशाली वाघ, प्रियांका शेळके, राजेंद्र शेळके यांनी विश्वासात घेऊन फिर्यादी यांचा मावस भाऊ संजय झांजे, पत्नी सौ.गिता असे यांचे समक्ष रोख रक्कम 3 लाख 25 हजार रूपये हे वैशाली वाघ यांना दिले.
त्यानंतर फिर्यादी यांनी वैशाली वाघ यांना राहु, पाटेठाण कारखान्याचे जवळ दोन एकराचा प्लाॅट दाखविला. त्यानंतर दोन दिवसांनी वैशाली वाघ यांची मुलगी प्रज्ञा वाघ हिने शेलार यांनी फोन करून तुंम्ही मम्मीकडे दिलेले 3,25,000/- रूपये हे आंम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले आहे त्याचे तुम्हाला 5 कोटी रूपयांचा नफा झालेला आहे. तरी तुम्ही आणखीन रक्कम गुतंवा, शेअर मार्केटमध्ये बाजार नफ्यांचा आहे असे सांगितले.
त्यानंतर ता.4/2/2021 रोजी दुपारी 12:21 वाचे. सूमारास शेलार यांनी यवत येथुन मनीट्रान्सफरद्वारे वैशाली वाघ यांचे सारस्वत बॅक खराडी बायपास शाखा पुणे येथील खात्यावर सुमारे 1 लाख 25 हजार रूपये पाठविले. त्यानंतर दि.5/2/2021 रोजी शेलार यांनी पुन्हा यवत गांवातील मनीट्रान्सफर द्वारे प्रज्ञा वाघ हिच्या सेंन्ट्रल बॅक आॅफ इंडिया शाखा आकाशवाणी हडपसर येथील खात्यावर 1 लाख 99 हजार 900 रूपये पाठविले व दि. 6/2/2021 रोजी गुगलपेदवारे वैशाली वाघ यांना 20 हजार रूपये पाठविले.
त्यानंतर पुन्हा फिर्यादी यांना वैशाली वाघ, प्रज्ञा वाघ यांचा फोन येत असलेने त्यांना दि. 11/2/2021 रोजी शेलार यांचे मित्र अमोल लडकत यांचेकडून 5 लाख रूपये उसने घेऊन हि रोख रक्कम त्यांनी प्रज्ञा वाघ हीचे हातात दिले तेंव्हा प्रज्ञा वाघ हीने ते पैसे वैशाली वाघ यांचे सारस्वत बॅक खराडी खात्यावर त्यांचा माझे समक्ष भरले होते.
व तेंव्हा वैशाली वाघ व प्रज्ञा वाघ यांनी शेलार यांना तुम्ही काळजी करू नका तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगला फायदा होणार आहे असे म्हणून विश्वासात घेतले.
दि. 26/2/2021 रोजी प्रज्ञा हीने शेलार यांना फोन करून तुम्ही माझे मम्मीचे खात्यावर अर्जंट 30 हजार रूपये पाठवा असे म्हणालेने शेलार यांनी त्यांचा भाऊ हेमंत शेलार यास वैशाली वाघ यांच्या खात्यावर 30 हजार रुपये तर दि. 1/5/2021 रोजी 1 लाख रूपये वैशाली वाघ यांचे खात्यावर पाठवत वैशाली वाघ व प्रज्ञा वाघ यांना एकुण 12 लाख 99 हजार 900 रूपये आत्तापर्यंत दिले होते.
त्यानंतर फिर्यादी दत्तात्रय शेलार व त्यांची पत्नी सौ.गिता शेलार यांनी वेळोवेळी वैशाली वाघ व प्रज्ञा वाघ, प्रियांका शेळके, राजेंद्र शेळके यांना फोन करून व समक्ष भेटुन तुम्ही आम्हाला शेअर मार्केटमध्ये नफा करून देणार होते त्याच काय झाले अशी विचारणा केली असता आरोपी हे फिर्यादी यांना तुमचे पैसे आम्ही शेअरमार्केटमध्ये गुंतवलेले आहे, तुम्हाला हडपसर मगरपटटा सिटीमध्ये फ्लॅट मिळालेला आहे. तुम्ही काळजी करू नका, असे म्हणून त्यांची समजूत काढत होते मात्र फिर्यादी यांनी तुम्ही आम्हाला फ्लॅट दाखवा असे म्हणालेने ते आज दाखवतो, उदया दाखवतो असे म्हणून टाळाटाळ करत होते त्यामुळे शेलार यांना संशय आल्याने त्यांनी मगर पट्टा सिटीमध्ये जावुन चौकशी केली असता तेथे त्यांच्या नांवावर कोणताही फ्लॅट नसल्याची माहीती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी अनेकवेळा वैशाली वाघ, प्रज्ञा वाघ यांना मला शेअर मार्केटमध्ये नफा नको तुम्ही माझे पैसे परत मला दया असे म्हणालेने त्यांनी आरोपींनी त्यांना दि.19/7/2021 रोजी 8 लाख रूपयेचा बॅक बडोदा शाखा यवत चा चेक आणि दि.23/7/2021 रोजी 5 लाख रुपायांचा सेंट्रल बॅक आॅफ इंडिया हडपसर शाखेचा असे दोन चेक दिले. ते चेक शेलार यांनी त्यांच्या खात्यावर जमा केले असता ते बाउंन्स झाले. हा सर्व प्रकार घडल्यानंतर ते व त्यांची पत्नी गिता असे दोघेजण वैशाली वाघ यांचे घरी गेले तेंव्हा तेथे प्रियांका राजेंद्र शेळके, राजेंद्र शेळके हेही उपस्थित होते. शेलार यांनी त्यांना माझे पैसे परत द्या, असे म्हणालेने त्यांनी फिर्यादी शेलार यांना शिवीगाळ दमदाटी करून तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर आम्ही चैघांनी मिळून तुझे पैसे वाटुन घेतलेले आहेत, तु आम्हाला पैसे परत मागितले तर आम्ही औषध पिवुन जिव देऊ आणि तुझे नावाने कोणतीही केस करू अशी धमकी दिली.
यामुळे शेलार यांना वैशाली वाघ, प्रज्ञा वाघ, प्रियांका राजेंद्र शेळके, राजेंद्र शेळके यांनी संगणमत करून शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देतो असे म्हणून पैशाचे आमिष दाखवुन 12 लाख 99 हजार 900 रुपयांची फसवणुक केल्याची खात्री झाली आणि त्यांनी यवत पोलीस ठाण्यात वरील चार आरोपींविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार रजपुत हे तपास करीत आहेत.