Categories: क्राईम

जेष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा दौंड राष्ट्रवादीकडून निषेध, मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाईची मागणी

दौंड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, मा. केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका संतप्त झालेल्या गटाने हल्ला बोल आंदोलन करीत पवार यांच्या घराच्या दिशेने चप्पल व दगड भिरकावले या घटनेचा दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने दौंड शहरात निषेध नोंदविण्यात आला. पक्षाच्यावतीने येथील संविधान स्तंभ परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी निषेध सभा घेण्यात आली, पवार साहेबांच्या घरावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट आहे,त्यामुळे कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादीचे पदाधिकारी वैशाली नागवडे, आप्पासो पवार ,गुरुमुख नारंग ,वीरधवल जगदाळे, बादशहा शेख, सोहेल खान, विकास खळदकर, योगिनी दिवेकर, वैशाली धगाटे, ऍड.कावेरी पवार तसेच पक्षाचे नगरसेवक, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
वैशाली नागवडे ,वीरधवल जगदाळे, आप्पासो पवार यांनी आपल्या भाषणातून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. या देशातील कामगार वर्ग, व्यापारी, उद्योजक, कष्टकरी वर्ग जेव्हा कधी अडचणीत असेल तेव्हा शरद पवार यांनी नेहमी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करून आनंद व्यक्त केला असे असताना काही विघ्न संतोषी प्रवृत्तीने काही कामगारांना फूस लावून त्यांना पुढे करून पवार यांच्या घरावर भ्याड हल्ला करावयास लावला. कोणाच्या तरी घरावर जाऊन हल्ला करणे संपूर्णपणे चुकीचे कृत्य आहे. व्यक्तिगत हल्ला होत असेल तर त्यावेळी समाजातील प्रत्येक घटकाने पेटून उठले पाहिजे आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून या घटनेतील सूत्रधारांना कडक शासन होणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामुळे यापुढे असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही असे मत पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

56 मि. ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago