नवी दिल्ली :
काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्रांवर खूप गंभीर आरोप केले आहेत, याबाबत आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती देताना गृहमंत्र्यांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या चौकशीसंदर्भात निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे म्हटले आहे अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
याबाबत परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केल्यानंतर गृहमंत्र्यांनीही हिरेन आत्महत्या प्रकरण आणि वाझे यांची चौकशीची तार आयुक्तांपर्यंत जात असल्याचा गौप्यस्फोट करून परमबीर सिंग यांनी केलेले आरोप बिनबुडाचे म्हटले होते, तर परमबीर सिंग हे मात्र आपल्या आरोपांवर ठाम आल्याचे दिसत आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिरसिंग यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर राज्यात मोठी खळबळ माजली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला मुंबईतील बार, रेस्टॉरंटकडून 1 ते 2 लाख रुपये दर महा जमा करायला लावून सुमारे 100 कोटीची वसुलीचे टार्गेट दिले होते असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांनी केला आहे.
परमबीर यांनी केलेल्या लेटरबॉम्ब नंतर महाआघाडी सरकारमध्ये राजकीय भूकंप आला होऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाऊ शकतो किंवा तर राजीनामा देतील असा कयास लावला जात होता, मात्र याबाबत काही हालचाल दिसत नसल्याने पत्रकारांनी थेट शरद पवारांची नेमकी भूमिका काय हे जाणून घेतले त्यावेळी पवार यांनी वरील भाष्य केले आहे.