सिध्देश्वर महाविद्यालयाचे नाईक ‘शंकर पासलकर’ यांच्या ‘सेवापूर्ती’ निमित्त पुरस्काराने सन्मान

राहुल अवचर

देऊळगाव राजे : देऊळगावराजे येथील सिध्देश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयतील नाईक ‘शंकर धोंडिबा पासलकर’ यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांना सेवापुर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात हा सोहळा पार पडला.

या सोहळ्यावेळी संस्था अध्यक्ष आप्पासाहेब पवार, सचिव हरिश्चंद्र ठोंबरे, संचालक काळूराम गोरे, आलेगावचे सरपंच नवनाथ कदम, भाजप युवकाध्यक्ष अभिमन्यू गिरमकर, तलाठी संघटनेचे माजी उपाध्यक्ष नामदेव पासलकर, आडमाळ पुनर्वसनचे सरपंच पल्लवी पासलकर, माजी सरपंच हेंमत पासलकर, विष्णू सूर्यवंशी, रामभाऊ शेडगे, देऊळगावराजे ग्रामपंचायत सदस्य पंकज बुराडे, बाबू पासलकर, भानुदास अवताडे, दादा गिरमकर, सुरेश नाक्ती, शाळेचे मुख्याध्यापक सुनील गावडे शाळेतील शिक्षिका, शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संस्थेची स्थापना झाल्यापासून शंकर पासलकर या संस्थेमध्ये ‘नाईक’ या पदावर काम करीत होते. त्यांनी आतापर्यंत अतिशय चोखपणे आपली जबाबदारी पार पाडली. संस्थेची स्थापना झाली तेव्हा अतिशय कमी पगारामध्ये त्यांनी या संस्थेत काम केले असून ३५ वर्ष त्यांनी नाईक पदावर काम केले आहे. येत्या ३० नोव्हेंबरला त्यांचा या संस्थेत काम करण्याचा शेवटचा दिवस असल्याने खास त्यांच्यासाठी ‘सेवापूर्ती पुरस्कार’ २५ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आला होता. हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला असून या कार्यक्रमासाठी त्यांच्या पत्नी, मुली, जावई व मुले उपस्थित होती.

कार्यक्रमावेळी देऊळगावराजे, आलेगाव, पेडगाव ग्रामस्थांच्यावतीने शंकर पासलकर आणि त्यांच्या पत्नी अलका पासलकर यांचा सत्कार करण्यात आला. पासलकर दांपत्याचा सत्कार होत असताना काहीवेळ वातावरण भावनिक बनले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय जोशी, शहाजी आवचर यांनी केले.