थायलंड : जगातील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नचे निधन झाले आहे. तो 52 वर्षांचा होता. फॉक्स स्पोर्ट्स न्यूज ने दिलेल्या माहितीनुसार वॉर्न थायलंडच्या कोह सामुईमध्ये होता. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. वॉर्नच्या व्यवस्थापन संघाने जारी केलेल्या निवेदनानुसार, शेन कोह सामुई येथील व्हिलामध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता.
श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वॉर्नच्या नावावर आहे. त्याने 1992 ते 2007 पर्यंत 145 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 25.41 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 708 बळी घेतले. मुरलीधरनने कसोटीत 800 बळी घेतले. 1993 ते 2005 पर्यंत त्याने 194 वनडेत 293 विकेट घेतल्या. 1999 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघात त्याचा मोलाचा वाटा होता.
१९९२ मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केले.
शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
12 तासांपूर्वी ट्विट करून रोडे मोर्श यांच्या निधनाबद्दल त्याने शोक व्यक्त
वॉर्नने 12 तासांपूर्वी शेवटचे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी रोडे मोर्श यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, तो आमच्या खेळाचा महान खेळाडू होता. त्यांनी अनेक तरुण मुला-मुलींना प्रेरणा दिली