पुणे : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. त्रास जाणवू लागल्याने त्यांना एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाची खबर मिळताच मंत्री छगन भुजबळ एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.
प्रा.हरी नरके हे जेष्ठ साहित्यिक आणि ल3लेखक होते. त्यांचा जन्म १ जून, १९६३ रोजी झाला होता. ते मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर म्हणून त्यांची ओळख होती. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या व तक्रारीची तपासणी करतो.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये, सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता किंवा जातीचा समावेश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस आदी गोष्टी करत असतो.