Selection – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लिगल सेल विभागाच्या दौंड शहराध्यक्षपदी सुरेश जाधव यांची फेरनिवड



|सहकारनामा|

दौंड : (शहर प्रतिनिधी)

दौंड शहरातील नामांकित वकील सुरेश जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेल( लॉयल फोरम) विभागाच्या शहराध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. दिनांक 24 जुलै रोजी लिगल सेल विभागाचे जिल्हाध्यक्ष दिलीप करंडे यांनी जाधव यांना नियुक्तीचे पत्र दिले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड. अजित बलदोटा, राजाभाऊ देसाई, संतोष आढाव तसेच वकील मित्र उपस्थित होते.