दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथे 24 लाख 30 हजारांचा गुटखा आणि 10 लाखांचा टेम्पो जप्त

दौंड : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथे एका आयशर टेम्पो मधून सुमारे 24 लाख 30 हजार रुपयांचा गुटखा पकडण्यात आला असून टेम्पोसह एकूण मुद्देमालाची किंमत ही 34 लाख 30 हजार इतकी आहे.

याबाबत श्रीमती क्रांती व्ही बारवकर (अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन म.रा.पुणे महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन 5 वा मजला ,बेगम चैक औध पुणे) यांनी कारवाई करत फिर्याद दिली असून आरोपी 1) यासीन घाउस खान 2) नइम अहमद खान 3) चौधरी, 4) कुंदाडे यांच्यावर. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. 16/02/2022 रोजी सकाळी 09ः00 ते 09ः20 च्या सुमारास बोरीपार्धी येथे करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार अन्न सुरक्षा, अन्न व औषध प्रशासन अधिकारी श्रीमती बारवकर यांना मिळालेल्या गुप्त माहिती नंतर त्यांनी दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी व श्री इलागेर यांसह दिनांक 16/02/2022 रोजी सकाळी 09ः00 वाजण्याच्या सुमारास बोरीपार्धी येथे थांबलेल्या आयशर टेंपो नं. केए 01 ए एच 5667 या वाहनाची तपासनी केली असता त्या मध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळुन आला. या वाहनातुन प्रतिबंधक गुटखा, पान मसाला साठा वाहतुक वितरण व विक्री करण्याच्या हेतूने यासीन घाउन खान याने साठवणुक केल्याचे आढळुन आले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन अधिकारी श्रीमती बारवकर यांनी याबाबत विचारणा केली असता आरोपिंनी सदर साठा हा चौधरी नामक व्यक्तीने (रा.राज्य बेंगलुर कार्नाटक) याने पुणे अहमद नगर रोड येथे कुदांडे या व्यक्तीला पुरवठा करायचा असल्याचे सांगीतले. सदरच्या साठयाबाबत अधिकाऱ्यांनी अधिक चौकषी केली असता समाधान कारक खुलासा न झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव ते वाहन बारवकर यांनी यवत पोलीस स्टेशन येथे आणून जमा केले. यातील वाहन चालक, वाहन मालक,माल पाठवणार आणि माल घेणार या चार आरोपिंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई नागरगोजे हे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

6 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

10 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago