Categories: क्राईम

अट्टल चोराकडून 40 मोटारसायकली जप्त, वेष बदलून चोरट्याचा शोध घेण्याची युक्ती पोलिसांना ठरली फलदाई

पुणे

पुणे जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटना वाढत चालल्या असून या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता पुणे ग्रामीण पोलिसही चांगलेच सरसावल्याचे पुढील घटनेवरून दिसत आहे.
वाहन चोरीच्या दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी चोरट्यांचा छडा लावून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी गुन्हे तपास पथकासोबत विशेष मोहिम राबवुन गुन्हे शोध
पथकातील पोलीस अंमलदार यांनी वेळोवेळी साध्या वेषात आठवडे बाजार तसेच वाहने पार्क करण्याची ठिकाणी सक्त पेट्रोलिंग करण्यात येत होते.

असेच पेट्रोलिंग करत असताना दिनांक १६/०५/२०२२ रोजी शिक्रापुर पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील पोना विकास पाटील, पोकॉ. निखील रावडे यांना शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे परीसरात मोटारसायकल चोरी करणारा एक अट्टल चोरटा हा कासारी फाट्याकडून तळेगाव ढमढेरे गावाकडे जात असल्याची माहिती मिळाली.
सदर माहिती बाबत त्यांनी गुन्हे तपास पथकाचे अधिकारी सपोनि. नितीन अतकरे यांना माहिती दिली असता सदर माहिती वरून पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे आदेशाने तपास पथकाने सापळा लावुन त्यामध्ये संशयित आरोपी अक्षय अनिल काळे (वय २३ वर्षे, रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरूर, जि. पुणे मुळ रा. साईबाबा मंदिराजवळ, साईनाथ नगर, चिंचोडी पाटील, ता. जि. अहमदनगर) यास ताब्यात घेतले. त्यानंतर शिक्रापूर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मोटारसायकलींच्या चोरी बाबत विचारपुस केली असता, त्याने शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे या गावांत मोटार सायकलींची चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपी अक्षय अनिल काळे याच्याकडून आत्तापर्यंत एकुण ४० मोटार सायकली जप्त
करण्यात आल्या असून जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकलींपैकी ३० गुन्हे उघडकीस आहेत तर उर्वरित मोटार सायकल मालकांची ओळख पटविणे चालु आहे.
आरोपी अक्षय अनिल काळे हा सध्या शिक्रापूर पोलीस स्टेशन गु. र.नं.४८५/२०२२, भा.द.वि. कलम ३७९ या गुन्हयात पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास हेमंत शेडगे (पोलीस निरीक्षक, शिक्रापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. अमोल दांडगे हे करीत आहेत. तसेच
अटक आरोपीकडुन अजुनही मोटार सायकली हस्तगत करण्याचे कामकाज चालु आहे.

सदरची कामगिरी ही डॉ. अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) मिलिंद मोहिते, (अपर पोलीस अधीक्षक बारामती) यशवंत गवारी, (उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर) यांचे मार्गदर्शनाखाली हेमंत शेडगे, पोलीस निरीक्षक, (शिक्रापूर पोलीस स्टेशन) नितीन अतकरे, सहा पोलीस निरीक्षक यांचेसह सफौ/ जितेंद्र पानसरे, पोहवा किशोर तेलंग, अमोल चव्हाण, विकास पाटील, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, सागर कोंढाळकर, रोहिदास पाखरे, पोकॉ.जयराज देवकर, निखील रावडे, लखन शिरसकर व किशोर शिवणकर यांचे
पथकाने केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago