Scrap Policy ‛त्या’ एकाच निर्णयाने हवेत असलेली जुनी वाहने आली जमिनीवर..



पुणे : सहकारनामा

संपूर्ण देशात स्क्रॅप पॉलिसी लागू होणार आणि जुनी वाहने भंगारात जाणार या एकाच निर्णयाने किंमतीच्या बाबतीत कायम हवेत असणारी जुनी वाहने एका रात्रीत जमिनीवर आली आहेत.

ज्यांची नवीन चारचाकी गाडी घेण्याची ऐपत नाही किंवा आधुनिक भाषेत ज्यांचे तेवढे बजेट नाही असा मोठा वर्ग हा आपल्या छोट्याशा कुटुंबासाठी ज्यावेळी जुने वाहन घेण्यासाठी बाहेर पडायचा त्यावेळी 15 ते 17 वर्षांची झालेली जुनी छोटी वाहनेही एक ते दीड लाखाच्या पुढेच त्याची किंमत सांगितली जायची. साधारण 60 ते 70 हजाराच्या बजेटमधील हि वाहने दुप्पट किमतीने घेताना सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला यायचा पण आपलेही एक छोटेसे वाहन असावे आणि आपल्या परिवारासोबत आपणही 100 किमी अंतराच्या टप्प्यात फिरावे हि भाबडी आशा ठेऊन हा वर्ग जास्त पैसे मोजून हि वाहने निमूटपणे विकत घ्यायचा. 

आता मात्र पंधरा ते वीस वर्षांच्या जुन्या वाहनांना स्क्रॅप पॉलिसी लागू होणार आणि हि वाहने भंगारात जाणार हि बातमी येतनाही तोच हि हवेत तरंगणारी वाहने एका रात्रीतच जमिनीवर आली आहेत. 

एक ते दीड लाख रुपये सांगितली जाणारी छोट्या वाहनांची किंमत आता चक्क साठ ते सत्तर हजारावर आली आहे. तर बिग बजेट मधील वाहनांच्या किमतीही आता एक ते दीड लाख रुपयांनी खाली उतरून आता त्याचे रेट हे जमिनीवर आले आहेत. आणि हळू हळू हि किंमत अजूनही कमी होत जाऊन हि पॉलिसी लागू होईपर्यंत भंगारात निघतील यात मात्र शंका नाही.