Categories: Previos News

‘ईश्वरी फाऊंडेशन’ संचालित ‘एलाईट किड्स’ शाळेचा 5 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

– रिता शेटीया

पुणे : 18 फेब्रुवारी 2022 रोजी ईश्वरी फाऊंडेशन संचालित एलाईट किड्स (आंबेगाव बु.) या शाळेचा 5 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महिला बालकल्याण समिती अध्यक्ष रुपालीताई धाडवे, हुजूरपागा शाळेच्या शिक्षिका / समाजसेविका सौ. शैलजा गोडांबे, सयोग वेंचर च्या संस्थापिका सौ. सपना काकडे, एलाईट शाळेच्या संस्थापिका प्रा. सौ. जागृती अभंग आणि एलाईट ग्रूप चे संचालक प्रा. श्रीकांत अभंग उपस्थित होते.

या प्रसंगी स्टोरी टेलिंग आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील विज्येत्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात येऊन शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्या मावळ्यांनी छान नृत्य सादर करत पोवाडे आणि शिवाजी महाराजांची छान माहिती सांगत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शनही केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. अश्विनी गाडे आणि सौ. ज्योती सरपाले यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

13 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

15 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

17 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago