Categories: पुणे

Saswad | सासवड येथे एकास हातातील कड्याने जबर मारहाण

सासवड : सासवड (ता.पुरंदर) येथे एका व्यक्तीस दुचाकीस्वाराने हातातील कडयाने तोंडावर मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत अमोल रजनीकांत जगताप (रा.हीवरे रोड, खंडोबानगर सासवड ता.पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.2 जून रोजी सकाळी 11:30 वाजता अमोल जगताप हे सासवड बाजारपेठ येथून जात असताना त्यांना एका अनोळखी दुचाकीस्वाराने धडक देऊन शिवीगाळ केली तसेच तोंडावर बुक्क्या आणि हातातील लोखंडी कड्याने जबर मारहाण केली.

तेथे स्थानिक नागरिक जमायला लागल्यानंतर मोटार सायकल स्वार तेथून निघून गेला. याबाबत फिर्यादी अमोल जगताप यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने यातील अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सासवड पोलीस ठाण्याचे पो.ह. कांबळे हे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

9 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago