Crime news – क्राईम न्यूज
पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये पुणे ग्रामीण मध्ये सर्वात जास्त चर्चा होतेय ती ‛संतोष जगताप’ याच्या उरुळी कांचन येथे झालेल्या खुनाची. संतोष जगताप याचा खून कोणी केला, कसा केला, कोण कोण मारेकरी होते आणि त्याच्या खुनाचे नेमके कारण काय होते..! असे एक ना अनेक प्रश्न सध्या पुणे ग्रामीणमध्ये चर्चिले जात आहेत आणि त्याबाबत मन घडंत कहानीही रचल्या जात आहेत. मात्र, संतोष जगतापचा खून होताना जे घडलंय ते नक्कीच भयावह आणि अंगाचा थरकाप उडवणारे होते हे मात्र नाकारून चालणार नाही.
संतोष जगताप हा दि. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी उरुळी कांचन येथील एका प्रसिद्ध हॉटेल मधून जेवण करून बाहेर पडला त्यावेळी त्याच्या दोन्ही बाजूला त्याचे बॉडीगार्ड चालत बाहेर पडले. नेमके याचवेळी संतोषच्या उजव्या बाजूने एकजण क्रॉस चालत चालत त्यांच्या दिशेने निघाला. तो सहज वर्दळीत चालणाऱ्या लोकांसारखा चालत आल्याने संतोष किंवा त्याच्या बॉडीगार्डला त्याचा संशय आला नाही. या इसमाने चालत येत असताना रस्त्याकडे तोंड करत आपल्या पॅन्टजवळ हात घातला आणि लपवलेले पिस्तुल काढून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हल्ल्याने संतोष हा भांबावून गेला मात्र पुढच्या हल्लेखोराची गोळी झाडण्याची पोजिशन पाहून तो एक साईडला झाला त्यामुळे गोळी त्याच्या समोरील बाजूने न लागता बाजूला गेली. (हा गोळ्या झाडणारा इसम म्हणजे पुणे पोलीसांनी इंदापूर येथे पकडलेल्या दोन इसमांपैकी एक असणारा महादेव आदलिंगे हा होता.) आदलिंगे याने गोळीबार करण्यास सुरुवात करताच संतोष जगताप याने हॉटेलच्या बाजूला धाव घेण्यास सुरुवात केली त्याचवेळी डाव्या बाजूने हल्ल्यासाठी थांबलेले स्वागत खैरे आणि पवन मिसाळ यांनी तिकडून संतोषवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यावेळी संतोष ने स्वतःला वाचविण्यासाठी त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या दुकानाकडे धाव घेत आत घुसला होता. त्यावेळी प्रथम त्यावर गोळी झाडणारा आदलिंगे हा पुढे येऊन संतोष ज्या दुकानात घुसला होता तिकडे जाऊ लागला त्यावेळी डाव्या बाजूला असलेल्या बोडिगार्डने हल्लेखोरांवर पिस्तुल रोखत असतानाच आदलिंगे याने त्या बॉडीगार्डवर गोळी चालवली. ती गोळी थेट त्या बोडिगार्डच्या मानेत लागल्याने तो खाली पडला. हे होत असताना संतोष त्या दुकानात घुसला होता तर त्यावर मिसाळ आणि खैरे हे दोघे गोळ्या चालवत त्याच्या मागे जात होते, त्यावेळी संतोष जगतापच्या दुसऱ्या बॉडीगार्डने पोझिशन घेत त्यांच्यावर पिस्तुल रोखल्याने ते थोडे बाजूला होताना दिसत होते, एवढ्यात संतोष हा दुकानातून पुन्हा रस्त्यावर उभ्या असलेल्या त्याच्या गाडीकडे धावू लागला त्यावेळी पवन मिसाळ आणि स्वागत खैरे याने पुन्हा गोळ्या झाडल्याने गोळ्या त्याच्या पाठीमागे लागून तो खाली कोसळला. हे पाहून संतोषच्या बॉडीगार्डनेही इकडून फायर करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याच्या गोळीने स्वागत खैरचा अचूक वेध घेतला तर पवन मिसाळ हा त्याचा पाय पायात गुतल्याने खाली पडला. मात्र पुन्हा उठून त्याने आणि आदलिंगे याने स्वागत खैरे याला त्यांनी आणलेल्या गाडीत टाकून थेट लोणीकाळभोर येथील एक हॉस्पिटल गाठले आणि तेथे खैरे याला टाकून ते पसार झाले. पुणे पोलीसांनी आरोपींचा शोध घेत त्यांचा मागमूस काढलाच आणि त्यांना युनिट 6 ने इंदापूरजवळ त्यांना हत्यार आणि गाडीसह ताब्यात घेतले. संतोष जगतापला मारण्यामागचे विविध पैलू असून यात त्याच्याकडून राहू येथे झालेला गोळीबार आणि त्यात झालेले दोघांचे खून, त्याने बाहेर आल्यानंतर स्वतःची तयार केलेली गॅंग आणि त्यामुळे तो वरचढ होऊनये म्हणून त्याचा झालेला खून अश्या चोहोबाजूंनी पोलीस तपास करत असून त्याचे खुनाचे यातील मुख्य कारण कोणते होते हे लवकरच समोर येईल ते आम्ही आमच्या वाचकांपर्यंत पोहचविण्याचा निश्चित प्रयत्न करू.
(संतोष जगतापवर हल्ला झालेली संपूर्ण घटना हि तेथील cctv मध्ये कैद झाली आहे)