Categories: क्राईम

‛संतोष जगताप’ हत्येमागे विष्णू जाधव गॅंग की दौंड तालुक्यातील ‛सोनवणे’ कुटुंब..! की अन्य काही.. पहा पोलीस आयुक्त काय म्हणाले

दौंड : दौंड तालुक्यातील राहू येथील मूळचा रहिवासी असणाऱ्या संतोष जगताप याचा 22 ऑक्टोबर रोजी खून झाला आणि त्याच्या खुनामागे कोण आहे आणि त्यांची पार्श्वभूमी काय याचा तपास पुणे पोलीसांनी सुरू केला आहे. मात्र काही ठिकाणी संतोष जगताप याच्या खुनामागे राहू येथील एक सोनवणे कुटुंबाचा हात असल्याचे सांगितले जात आहे तर काही ठिकाणी अप्पा लोंढे खुनातील आरोपी विष्णू जाधव याचा हात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत पुणे पोलीसांनी अजून तरी तसे काही स्पष्ट जाहीर केले नसून संतोष जगताप याने केलेल्या गोळीबारात सोनवणे कुटुंबतील दोन जणांचा बळी गेला होता त्यामुळे त्याचा खून सोनवणे कुटुंबाने घडवून आणला असावा का? याबाबत सध्या तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माध्यमांना दिली आहे. संतोष जगताप खुनातील आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून पोलीस माहिती मिळवत आहेत आणि यात विष्णू जाधव की, संतोष जगताप सोनवणे वाद हाही पैलू तपासला जात आहे. मात्र अजून सोनवणे यांचा या खुनात सहभाग आहेच? याबाबत पोलीस आयुक्तांनी तसे काही अजून स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे संतोष जगतापचा खून नेमका कोणत्या कारणामुळे आणि कोणी घडवून आणला या प्रश्नांच्या उत्तरासाठी पोलीसांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीची वाट पाहावी लागणार आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

22 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago