लोणी काळभोर : उरूळीकांचन येथील संतोष जगताप हत्याकांडातील मुख्य सूत्रधार आरोपी उमेश सोनवणे यास अटक करण्यात आली आहे.
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हददीत दि.२२/१०/२०२१ रोजी दुपारी ०२:३० वा चे सु।। उरूळीकांचन येथे हॉटेल सोनाई समोर इसम नामे संतोष संपतराव जगताप रा.राहु ता दौंड जि.पुणे याचेवर तीन अनोळखी इसमांकडुन झालेल्या फायरींगमध्ये संतोष जगताप हा जागीच ठार झाला होता. तर त्याचे अंगरक्षक शैलेंद्रसिंग व मोनुसिंग हे गंभीर जखमी झाले होते. यावेळी संतोष जगताप याचे अंगरक्षकाकडुन केलेल्या फायरींगमध्ये मारेक-या मधील एक मारेकरी जागीच ठार झाला होता.
याबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं.५७१/२०२१ भा.द.वि.क.३०२,३०७,३४,आर्म अॅक्ट
३(२५),५(२७) किमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
यात आरोपी पवन गोरख मिसाळ (वय २९ वर्षे) व महादेव बाळासाहेब आदलिंगे
(वय २६ वर्षे दोघे रा.उरूळीकांचन ता.हवेली जि.पुणे) यांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडे करण्यात आलेल्या
तपासदरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा उमेश सोपान सोनवणे (रा.राहु ता.दौंड जि.पुणे) याचे सांगण्यावरून कट रचुन केल्याचे निष्पण
झाले. परंतु उमेश सोनावणे हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता.त्याचा शोध घेणेकामी श्री.राजेंद्र मोकाशी वरीष्ठ पोलीस
निरीक्षक यांनी तपास पथकास आदेश दिले होते. त्याअनुषंगाने तपास पथक यातील उमेश सोनवणे याचा शोध घेत असताना तपास पथक प्रमुख सपोनि/राजु महानोर यांना उमेश सोनवणे हा दि.२८/१०/२०२१ रोजी कानीफनाथ हॉटेल,पिर फाटा ,ता.शिरूर जि.पुणे येथे येणार असलेबाबत माहीती मिळाली त्यानुसार सपोनि/राजु महानोर यांनी वपोनि/राजेंद्र मोकाशी यांना कळवुन त्यांचे आदेशाप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असताना बातमीप्रमाणे उमेश सोनवणे हा कानीफनाथ हॉटेल येथे आलेनंतर त्यास तपास पथकाने
शिताफीने ताबेत घेतले.
उमेश सोपान सोनवणे यांस गुन्हयात अटक करून आज रोजी मा.न्यायालयात हजर केले
असता मा.न्यायालयाने त्याची १० दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.पुढील तपास वपोनि/राजेंद्र मोकाशी
हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा श्री नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, मा.श्री.कल्याणराव विधाते स.पो.आ. हडपसर विभाग श्री.राजेन्द्र मोकाशी वपोनि, सुभाष काळे पोनि (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी
सपोनि/राजु महानोर,पोसई/अमित गोरे पो.हवा/नितीन गायकवाड,गणेश सातपुते, पो.ना/अमित साळुके,श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संभाजी देविकर , पो.कॉ/, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुके, यांचे
पथकाने केली आहे.