पुणे : उरुळी कांचन येथे वाळू व्यावसायिक संतोष जगताप याचा जो खून झाला आहे त्या मागील सर्व पाळेमुळे खणून काढणार असून यातील दोन आरोपी जेरबंद केल्यामुळे त्यांच्याकडून महत्वाचे धागेदोरे हाती येत असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
संतोष जगताप याचा खून झाल्यानंतर गुन्हे शाखा, युनिट-६, पुणे शहर कुख्यात गुन्हेगार संतोष जगतापचा खुन करणा-या दोघांना
घातक शस्त्रासह ३० तासाच्या आत जेरबंद करण्यात यश आले आहे. वाळू व्यवसायिक संतोष जगताप याच्यावर दिवसाढवळया लोणी काळभोर स्टेशनच्या हद्दीमध्ये उरळी कांचन येथील हॉटेल सोनाईसमोर गोळीबार झाला होता, संतोष जगताप हा मयत होऊन त्याचा अंगरक्षक गंभीर जखमी झाला होता, लोणी-काळभोर पोलीस स्टेशन गु.र.क्र.५७१/२०२१ भादवि कलम ३०२,३०७,३४,सह आ ३(२५),५(२७)सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट ३,७ अन्वये दिनांक २२/१०/२०२१ रोज दाखल असून नमूद गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत चालू असताना मा अपर
आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री.रामनाथ पोकळे यांना आरोपीचे ठिकाणाविषयी माहिती मिळाली त्याप्रमाणे गुन्हे शाखा, युनिट-६ चे अधिकारी यांना सदरबाबत माहिती देवून
मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावून आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशित दिले होते. पथकासह सदर ठिकाणी जावुन आरोपी नामे १) पवन गोरख मिसाळ (वय-२९ वर्षे, व्यवसाय,सप्लायर, रा.दत्तवाडी, उरळी-कांचन, हवेली, जि.पुणे २) महादेव बाळासाहेब आदलिंगे, वयधंदा-शेती, रा.जूनी तांबे वस्ती, दत्तवाडी, उरळी-कांचन, हवेली, जि.पुणे यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्यात जे चारचाकी वाहन वापरण्यात आले होते तेही जप्त करण्यात आले आहे. तसेच या आरोपींकडून आता महत्त्वपूर्ण माहिती आणि या गुन्ह्यासंदर्भातील धागेदोरे हाती येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच या खुनाचा विविध बाजूंनी तपास करण्यात येत यात नेमकं कोण कोण आणि कश्या पद्धतीने सामील आहे याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. आरोपींना पकडण्याची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह-आयुक्त पुणे शहर, डॉ.रविंद्र शिसवे, मा.अपर पोलीस आयुक्त शहर श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री श्रीनिवास घाडगे, मा.सहा पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर,श्री. लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शन शाखा, युनिट-६ चे पोलीस निरीक्षक,गणेश माने, सहा.पो.निरी. नरेंद्र पाटील, पो.उपनिरीक्षक सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास
तांबेकर यांनी केली आहे.