लोणीकाळभोर : दि. 22 ऑक्टोबर रोजी उरुळी कांचन येथे संतोष जगताप या वाळू व्यावसायिकाचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी लोणी काळभोर पोलीसांनी आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली होती. आता यात पुन्हा एकाची भर पडली असून आता अटक आरोपींची संख्या 6 झाली आहे.
संतोष जगताप खून प्रकरणात अगोदर संतोषवर गोळ्या झाडणाऱ्या मिसाळ आणि आदलिंगे यांना पोलीसांनी अगोदर अटक केली होती. त्यानंतर या दोघांनी हा खून राहू येथील उमेश सोनवणे याच्या सांगण्यावरून व उमेश सोनवणे याने रचलेल्या कटावरून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. यानंतर उमेश सोनवणे याला अटक केल्यानंतर आरोपींना पिस्तुल पुरविल्या प्रकरणी आणखीन दोघांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे अटक आरोपींची संख्या 5 झाली होती.
या खुनात आता राहू येथून आणखी एकाला अटक करण्यात आली असून त्याचे नाव महेश भाऊसाहेब सोनवणे (वय 28, रा. राहू ता.दौंड. पुणे) असे असल्याचे लोणीकाळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
संतोष जगताप याच्यावर 22 ऑक्टोबर रोजी दुपारी उरुळी कांचन येथे तिघांनी गोळीबाराल केला होता. या गोळीबारात संतोष जगताप, त्याचा अंगरक्षक आणि हल्लेखोर स्वागत खैरे असे तिघे ठार झाले होते. या हल्ल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 6 कडून आदलिंगे आणि मिसाळ यांना त्याच दिवशी रात्री इंदापूर येथून अटक करण्यात आले होते.