‛संतोष जगताप’ हत्याकांडात 3 रा ‛खून’, पोलीसांनी दिला दुजोरा

पुणे : दौंड तालुक्यातील राहू येथील वाळू व्यावसायिक संतोष जगताप याच्यावर उरुळी कांचन येथे गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात संतोष जगताप आणि त्याचा हल्लेखोर स्वागत खैरे हे दोघेजण जागीच ठार झाले होते तर संतोष जगताप याचा अंगरक्षक मोनूसिंग हा गंभीर जखमी झाला होता.

काल रात्री मोनूसिंग याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती संतोष जगताप खून प्रकरण हाताळणारे लोणीकाळभोर चे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे. त्यामुळे संतोष जगताप हल्ल्यातील मृतांची संख्या आता 3 झाली आहे.

उरुळी कांचन मधील हॉटेल सोनाई समोर संतोष जगताप याच्यावर जवळून तिघांनी गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात संतोष जगताप ठार झाला होता तर मोनूसिंग हा गंभीर जखमी झाला होता. यात एक हल्लेखोर स्वागत खैरे हाही ठार झाला होता.

संतोष जगताप खून प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अगोदर महादेव आदलिंगे, पवन मिसाळ, यांना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या खुनातील मुख्य सूत्रधार उमेश सोनवणे याला नंतर अटक करण्यात आली होती. तर या सर्वांना पिस्तुल पुरविणाऱ्या अभिजीत यादव आणि आकाश वाघमोडे यांनाही पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या पोलीस पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. संतोष जगताप खून प्रकरणी आत्तापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून या हत्याकांडात आता मृतांची संख्या 3 झाली आहे.