Categories: क्राईम

संतोष जगताप ‛खून’ प्रकरण : पुन्हा दोघांना अटक, अटक आरोपींची संख्या 5 तर आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

लोणीकाळभोर :
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या उरुळी कांचनमध्ये दि.२२/१०/२०२१ रोजी दुपारी ०२:३० वा चे सुमारास हॉटेल सोनाई समोर संतोष संपतराव जगताप (रा.राहु ता.दौंड जि.पुण याच्यावर तीन अनोळखी इसमांकडुन झालेल्या फायरींगमध्ये संतोष जगताप हा जागीच ठार झाला होता. तर त्याचे अंगरक्षक शैलेंद्रसिंग व
मोनुसिंग हे गंभीर जखमी झाले होते तसेच संतोष जगताप याचे अंगरक्षकाकडुन केलेल्या फायरींगमध्ये मारेक-यामधील एक मारेकरी जागीच ठार झाला होता.

याबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात संतोष जगताप याचे मारेकरी पवन गोरख मिसाळ (वय २९ वर्षे) व महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २६ वर्षे दोघे रा.उरूळीकांचन ता.हवेली जि.पुणे) तसेच सुत्रधार उमेश सोपान
सोनवणे (वय ३४ वर्षे,रा.राहु ता.दौंड जि.पुणे) यांना अटक करण्यात आली होती. आरोपींनी खून करताना वापरलेले गावठी पिस्तुल हे कसे व कुठून आणले याबाबत त्यांच्याकडे चौकशी जेली असता आरोपींना गावठी पिस्तुल हे अभिजीत सोपान यादव (रा.मेडद,ता.बारामती जि.पुणे) व आकाश जगन्नाथ वाघमोडे (रा.कुर्डवाडी म्हाडा जि .सोलापुर) यांनी पुरवल्याचे तपासात निष्पण झाले आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोनि राजेंद्र मोकाशी यांनी पिस्तुल पुरवणा-या इसमांचा शोध घेणेसाठी तपास पथक प्रमुख सपोनि/ राजु महानोर
यांना आदेश दिले होते.

आदेशाप्रमाणे तपास पथकाने बातमीदार यांचे बातमीवरून तसेच तांत्रीक विश्लेषणाव्दारे
आकाश वाघमोडे व अभिजीत यादव यांचा शोध घेवुन आकाश वाघमोडे यास कुर्डवाडी येथून तर अभिजीत यादव यास बारामती येथुन शिताफीने ताब्यात घेतले आहे. लोणीकाळभोर पोलिसांनी आरोपींना अटक करून आज रोजी मा. न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्यांना दि. ०८/११/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वपोनि/ राजेंद्र मोकाशी हे करीत आहेत.
वरील उल्लेखनीय कामगिरी मा.श्री.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेषीक विभाग, पुणे शहर, मा.नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, मा.श्री.कल्याणराव विधाते स.पो.आ. हडपसर विभाग श्री.
राजेन्द्र मोकाशी वपोनि, सुभाष काळे पोनि (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी सपोनि/राजु महानोर, पो.हवा/नितीन गायकवाड, पो.ना/श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, पो. कॉ/ शैलेश कुदळे, राजेश दराडे यांचे पथकाने केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago