Categories: क्राईम

अखेर त्या हत्याकांडात ‛संतोष जगताप’ त्याचा हल्लेखोरही ठार… मृतांचा आकडा 2 वर, जाणून घ्या 2 रा हल्लेखोर कोण..!

पुणे : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे भर चौकात, हॉटेल सोनाई समोर राहू येथील वाळू व्यावसायिक संतोष जगताप आणि त्याच्या साथीदारांवर करण्यात आलेल्या गोळीबारात संतोष जगताप सह त्याचा हल्लेखोरही ठार झाला आहे. संतोष जगतापवर हा हल्ला होत असताना अंगरक्षकाने प्रत्युत्तर देताना केलेल्या गोळीबारात समोरील एक हल्लेखोर ठार झाला असून त्याचे नाव स्वागत बापू खैरे असे असल्याचे व तो उरुळी येथीलच असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. खैरे हा मागील एका खुनातील आरोपी होता. या हल्ल्यात हल्लेखोरांतील अजून एकजण गंभीर झाल्याची माहिती मिळत असून पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.
असे घडले हत्याकांड…
संतोष जगताप हा दौंड तालुक्यातील राहू येथील रहिवासी होता. मागील काळात राहू गावात झालेल्या एका मोठ्या हिंसाचारामध्ये त्याच्या हातून गोळीबार होऊन दोन जणांचा बळी गेला होता. यानंतर संतोष जगतापला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. हे हत्याकांड झाल्यानंतर संतोष जगतापची सुपारी देऊन त्याचा खून करण्याचा प्रयत्न झाला होता ज्यामध्ये संतोष जगताप बचावला होता. यात यवत पोलीसांनी काहींना अटक केली होती. मात्र आज करण्यात आलेला हल्ला हा पूर्वनियोजित असावा असा कयास लावला जात असून संतोष जगतापवर पाळत ठेवून नंतर त्यावर उरुळी कांनचमध्ये गोळीबार करण्यात आला आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. हल्ल्यात संतोष जगतापचे दोन्ही अंगरक्षकही गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

6 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago