सुधीर गोखले
सांगली : संपूर्ण महाराष्ट्रात आगळी वेगळी परंपरा असलेला सांगली संस्थानचा चोर गणपती आज विराजमान झाला आणि संस्थानच्या गणेशोत्सवास प्रारंभ झाला. संस्थानचे पूर्व अधिपती चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी या वैशिष्टपूर्ण असलेल्या चोर गणपतीची प्रतिष्ठापना करून सांगली जिल्ह्याची एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली. दोन शतकांहून अधिक परंपरा या उत्सवाला आहे, भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला या गणपतीचे गुपचूप आगमन मंदिरात होते.
पर्यावरणपूरक मूर्ती ची परंपरा
या चोर गणापती ची मूर्ती हि कागदी लगद्यापासून बनवलेली जाते, साधारण दोनशे वर्षापूर्वी संस्थानकाळात कागदाच्या लगद्यापासून हि मूर्ती बनवली गेली तेव्हापासून या प्रकारच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा पायंडा पडला आहे, साडेतीन फूट उंचीच्या दोन मूर्ती बनवल्या जातात या मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसवल्या जातात या मूर्तीवर नुसते रंगकाम केलेले असते उत्सवानंतर मूर्ती सुरक्षित स्थळी ठेवल्या जातात.
या चोर गणपती च्या आगमनानंतर संस्थानचा गणेशोत्सवाचा प्रारंभ झाल्याचे संस्थानचे अधिपती श्री विजयसिंहराजे पटवर्धन यांनी सहकारनामा शी बोलताना सांगितले, ते पुढे म्हणाले कि, महापूजेनंतर या चोर गणपतीला निरोप दिला जाईल, या चोर गणपतीची प्रतिपदेला म्हणजे मुख्य उत्सवाच्या आधी तीन दिवस प्रतिष्ठापना होते. हा गणपती कधी आला आणि गेला याची माहितीही भाविकांना होत नसल्याने याला चोर गणपती म्हणायची प्रथा रूढ झाल्याचे त्यांनी सांगलीतले.
श्री गणेश मंदिरात पहाटे या चोर गणपतीची प्रतिष्ठापना संस्थानचे पुजारी, ट्रस्टी आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झाली या प्रतिष्ठापने नंतर संस्थानच्या दरबार हॉल मध्ये संस्थानच्या गणेशोत्सवाचा प्रारंभ होतो, महापूजा आणि प्रसाद झाल्यावर चोर गणपतीला गुपचूप निरोप दिला जाईल
सांगलीमध्ये स्व. लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत विद्यालय करा आम्ही जागा उपलब्ध करून देऊ
नुकताच राज्य शासनाने गानसाम्रादनी स्व.लता मंगेशकर यांच्या नावाने अंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभारण्याचा चांगला निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहेच मुळात लतादीदी या सांगलीच्या होत्या त्यामुळे हे विद्यालय सांगलीत व्हावे अशी सांगलीकर नागरिकांची तसेच आमचीही इच्छा आहे त्यासाठी आवश्यक असणारी जागा आम्ही संस्थान मार्फत उपलब्ध करून देऊ अशी घोषणा अधिपती विजयासिंह पटवर्धन यांनी केली, लतादीदींचे बालपण सांगलीमध्ये गेले मंगेशकर कुटुंबाची नाळ या सांगलीच्या मातीशी जुळलेली आहे, त्यांच्या नावाचे संगीत विद्यालय सांगलीत व्हावे यानिमित्ताने सांगलीचे नावही अंतरराष्ट्रीय पातळीवर होईल यासाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही आम्ही शासन कारभारी देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, संस्थानची सुमारे चारशे एकर जागा तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे आहे. विद्यार्थी हितासाठी प्रस्तावित शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास आवश्यक असेल तर हि जागा उपलब्ध करून देऊ राष्ट्रीय महामार्गही या तालुक्यातून गाला आहे.