Sangli Murder | इस्लामपुरात गुंड पुजारीचा ‘निर्घृण खून’, बहे रस्त्यावरील मध्यरात्री घडली घटना

सुधीर गोखले

सांगली : माझ्या गँगमध्ये सहभागी का होत नाहीस असं म्हणत शहरातील सराईत गुंड प्रकाश महादेव पुजारी (वय २४) याचा मंगळवारी मध्यरात्री डोक्यात धारधार शस्त्राने वार करून त्याच्या मित्रांनीच खून केला. या प्रकारानंतर एकच खळबळ माजली आहे. 
नवीन बहे नाका परिसरातील चौकात मल्हार बार समोर हा प्रकार घडला आहे. खुनानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं आहे.

मृत प्रकाशचे गुन्हेगारी क्षेत्रातील सहकारी गजराज पाटील, सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल व त्यांचा अनोळखी एक साथीदार यांनी चॉपर व दगड विटांनी हल्ला चढवला. तर सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल व त्यांचा अनोळखी साथीदार यांनी मिळून लाथाबुक्यानी आणि दगड व विटाने मारहाण करून त्याचा खून केला. याबाबतची फिर्याद रोहन रविंद्र इच्चुर याने इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

गजराज पाटील, सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल व त्यांचा अनोळखी एक साथीदार या चार जणांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री इस्लापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी परिसरात पथके रवाना झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.