Sangali |सांगलीला मुसळधार पावसाने झोडपले.. शहर जलमय, रस्त्यावर पाणी साठल्याने वाहतूक खोळंबली

सुधीर गोखले

सांगली : जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सांगलीला चांगलेच झोडपले आहे. काही ठिकाणी सुसाट वाऱ्यामुळे वृक्ष पडले तर जोरदार झालेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी साठून राहिल्याने वाहतुक खोळंबली होती.

साधारण दुपारी ४ च्या दरम्यान वादळी वाऱ्यांनी अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या त्यामुळे विद्युत प्रवाहही खंडित झाला. सलग दोन ते तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने मान्सून च्या आगमनाआधी रस्त्यांची ट्रायल घेतली आणि नेहमीप्रमाणे पाण्याचा निचऱ्याची सोय नसल्याने पाणी रस्त्यावर तसेच साठून राहिले. उत्तर शिवाजीनगर, काँग्रेस कमिटी परिसर रॅम मंदिर चौक सिव्हिल हॉस्पिटल परिसर, स्टेशन रोड, स्टॅन्ड रोड, आमराई परिसर, या भागात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साठून राहिले त्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प राहिली.

शहरात गेल्या चार दिवसांपासून अपवाद वगळता दररोज सायंकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही अंशी उष्मा कमी झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी व शनिवारी आकाश निरभ्र राहणार असून त्यानंतर दोन दिवस पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात तापमानही चाळीस अंश सेल्सियस राहण्याची श्यक्यता आहे.


विद्युत पुरवठा खंडित
काल झालेल्या वादळी पावसाने विद्युत पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला काही ठिकाणी झाडाच्या फांद्या विद्युत वाहक तारेवर पडल्याने तारा तुटल्या व विद्युत पुरवठा खंडित झाला. सांगली शहरापेक्षा मिरजेमध्ये विद्युत पुरवठ्यावर कमालीचा परिणाम झाला इतर दिवशी मंगळवारी वीज वितरण कंपनी काय मेंटेनंस करते असा प्रश्नही नागरिकांना पडला तर मिरज विभागीय अति. कार्यकारी अभियंता भालचंद्र तिळवे यांना सहकारनामा न्यूज नेटवर्क ने संपर्क केला असता काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याने त्यांनी सांगितले. पण सायंकाळी वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.