सांगली | 30 वर्षीय मुलाची कुऱ्हाडीने हत्या करून बाप पोहोचला पोलीस ठाण्यात

मिरज : सांगली च्या मिरज मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापानेच आपल्या मुलाचा कुऱ्हाडीच्या साहाय्याने खून करून नंतर त्याचे तुकडे करून ते तलावात टाकल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे मुलाचा खून करून बाप स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

राजेंद्र यल्लाप्पा हंडिफोड असे या 50 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याने त्याचा 30 वर्षीय मुलगा रोहित याची त्याने हत्या केली आहे. राजेंद्र हंडिफोड हा कुटुंबासह मिरज येथील गणेश तलाव लक्ष्मी मंदिर परिसरात राहतो. रोहित याला दारू आणि जुगाराचे व्यसन होते तो व्यसन करण्यासाठी कुटुंबाला त्रास देत असल्याने त्याचे वडील राजेंद्र याने रोहित ची कुऱ्हाडीने हत्या करत मृतदेहाचे कटरने तुकडे केले आणि ते तुकडे पोत्यात भरून त्यातील काही तुकडे गणेश तलावात आणून टाकले असल्याचेही सांगितले.

अचानक हा सर्व प्रकार घडल्याने मिरज पोलिसांमध्येही खळबळ उडाली. मिरज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. मुलगा कुटुंबाला त्रास देतो म्हणून त्याची इतक्या निर्दयपणे हत्या करून त्याचे तुकडे तलावात फेकल्याची माहिती मिरज मध्ये पसरताच एकच खळबळ माजली. विशेष म्हणजे पोटच्या मुलाला जीवे मारून सुद्धा राजेंद्र हंडीफोड याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा पश्चाताप अथवा कसलेही दुःख दिसून येत नव्हते.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago