संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी महापालिका सज्ज, हनुमाननगर येथे हेलिपॅड तर पूरग्रस्तांसाठी तात्पुरत्या ३४ निवारा केंद्रांचे नियोजन – आयुक्त सुनील पवार

सुधीर गोखले

सांगली : यंदा मान्सून च्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाची सर्वंकष बैठक पार पडली सर्व तयारीनिशी संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी मनपा सज्ज असून हनुमाननगर येथे स्केटिंग ट्रॅक च्या जागी हेलिपॅडची निर्मिती त्याच बरोबर मनपा क्षेत्रामध्ये ३४ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात निवारा केंद्रे उभी केली जाणार आहेत. याबाबत आढावा बैठक घेण्यात आली असून या बैठकीमध्ये महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, गटनेते संजय मेंढे भारती दिगडे, मैनुद्दीन बागवान हे बाठकीमध्ये उपस्थित होते.

बैठकीमध्ये उपायुक्त राहुल रोकडे यांनी प्रशासनाच्या तयारीची माहिती स्लाईड शो द्वारे दिली. पावसामध्ये धोकादायक बनलेल्या इमारती पडून कोणतीही हानी होऊ नये यासाठी ३५ इमारती उतरून घेण्यात आल्या आहेत तर अन्य इमारतींना नोटीस देण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त लोकांना राहण्यासाठी मनपा क्षेत्रामध्ये ३५ ठिकाणी निवारा केंद्रांची सोय करण्यात येईल. तिथे त्यांना चहा नाश्ता दोन वेळचे जेवण दिले जाईल तसेच विद्युत पुरवठा आणि स्वछता गृहे उभारली जातील तसेच नालेसफाई वेळेत पूर्ण झाल्याने पाण्याचा निचरा जलद होईल पूर भागातील धोकादायक खांब काढणे तसेच निवारा केंद्रातील विद्युत पुरवठ्याचे नियोजन झाले आहे. पर्यायी स्मशानभूमी मध्ये अंत्य संस्काराची सोय पूरपट्ट्यातील जनावरांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवण्याची सोय बोटींची सोय खाजगी बोटिंग क्लब शी संवाद आदी कामे प्रगतीपथावर आहेत नदी कडे येणारे रस्ते पूर काळामध्ये मोठ्या वाहनांसाठी बंद करणे आदी कामासाठी पोलीस प्रशासनाबरोबर बैठकीचे नियोजन आहे. पूर ओसरल्यावर साथीचे रोग पसरू नयेत यासाठी औषध फवारणी व पुरेसा औषध साठा यासाठी नियोजन सुरु केले आहे. सांगलवाडी येथे तात्पुरते अग्निशमन केंद्र सुरु केले जाईल.

या चर्चेमध्ये नगरसेवक संतोष पाटील अजिंक्य पाटील विजय घाडगे, सुबराव मद्रासी, मंगेश चव्हाण, युवराज बावडेकर, जमील बागवान, जगन्नाथ ठोकळे, फिरोज पठाण,  नगरसेविका उर्मिला बेलवलकर, लक्ष्मी सरगर, नसीमा नाईक, सविता मदने आदींनी सहभाग घेतला.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago