Categories: क्राईम

Sangli Breaking News | सांगलीत दिवसाढवळ्या गोळीबार करत सशस्त्र दरोडा, कायदा व सुव्यवस्थेचे वाजले ‘तीन तेरा’

सुधीर गोखले

सांगली : विश्रामबाग परिसरामध्ये दिवसाढवळ्या दरोडेखोरांनी सोने लुटले. विश्रामबाग परिसरातील मध्य वस्तीमध्ये पोलीस मुख्यालयालगत असलेल्या रिलायन्स ज्वेल या सोन्याच्या शोरूम मध्ये दिवसाढवळ्या दरोडेखोरांनी गोळीबार करत सशस्त्र दरोडा घातला. आज दुपारी चार वाजता घडलेले या घटनेमुळे विश्रामबाग परिसर तसेच सांगली जिल्हा हादरला आहे.

या सोन्याच्या शोरूम जवळून अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरावर पोलीस मुख्यालय आहे हे विशेष. आज झालेल्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे नागरिकांमधून भावना आहे. रात्री असाच गोळीबार नागरिकांना ऐकायला मिळाला होता. आज दुपारी 4:00 च्या दरम्यान दरोड्याची घटना घडली असून या दरोड्यानंतर दरोडेखोर फरार झाले आहेत.

या ठिकाणावरून विश्रामबाग पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे तर मुख्यालय जवळच आहे. जेथे दरोडा पडला ते ठिकाण जिल्ह्याचे मुख्य बाजारपेठ आहे. या दुपारच्या झालेल्या सशस्त्र दरोड्यानंतर व गोळीबाराच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस यंत्रणा सुस्तावली आहे की काय असा प्रश्न जनतेमध्ये उपस्थित केला जात आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

20 मि. ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

21 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago