चंदन तस्कर चोरट्यांना दौंड पोलिसांनी पाठलाग करुन मुद्देमालासह पकडले.. आरोपिंमध्ये केडगाव, दापोडी, देलवडी, वाखारी आणि निरा येथील चोरट्यांचा समावेश

कुरकुंभ, दौंड : दिनांक 29/9/2025 रोजी पहाटे 04:30 वाजण्याची सुमारास कुरकुंभ midc येथील अल्कली अमाईन कंपनीचे जवळ काही चोरटे चंदनाच्या झाडाची तोड करून चोरून नेत आहेत अशी गोपनीय माहिती दौंड पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी पोलीस पथकाने छापा टाकला असता ५ आरोपी पळून जाताना पोलीस पथकाने अंधारात त्याचा पाठलाग करून त्यापैकी ४ आरोपी ताब्यात घेतले.

या आरोपिंमध्ये १) नितीन संजय माने (वय ३८ वर्ष रा. नीरा ता. पुरंदर जि. पुणे)
२) भाऊसाहेब गोरख जाधव (वय २७ वर्ष देलवडी, ता. दौंड, जि. पुणे)
३) लहू तानाजी जाधव (वय ३६ वर्ष रा. दापोडी ता. दौंड जि. पुणे)
४) अनिल अशोक माने (वय 40 वर्ष रा. केडगाव चौफुला ता. दौंड जि. पुणे) हे चोरटे चंदनाच्या लाकडासह मिळून आले असून त्यांचा साथीदार
५) दिगंबर बलाशा काळे (वय ४० वर्षे रा. वाखारी, ता. दौंड जि. पुणे) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे.

वरील चोरट्यांच्या ताब्यातून एकूण 180 किलो चंदनाचे 9 चंदनाची लाकडे ज्याची किंमत  एकूण किंमत 1 लाख 80,000 हजार रुपये व चंदनाचे झाड तोडण्यासाठी लागणारे साधन मिळून आलेले आहे. याबाबत संजय कोठावळे यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस स्टेशन येथे BNS 303(2)’329,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किरण ढुके करीत आहेत. सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस हवालदार पठाण पोलीस हवालदार सागर म्हेत्रे, पोलीस हवालदार किरण पांढरे, संजय कोठावळे, निखिल जाधव अमीर शेख यांनी केली आहे.