Categories: क्राईम

‘वाळू’ माफियांचा भीमा नदीपात्रातील उच्छाद पुन्हा सुरू ! आता ‘वरदहस्त’ नेमका कोणाचा ?

दौंड : (अख्तर काझी)

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील देऊळगावराजे, पेडगाव व शिरापूर गावठाण हद्दीतील भीमा नदी पात्रातून येथील वाळू माफियांनी पुन्हा एकदा अवैध वाळू उपसा करण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र आहे.

वाळू माफिया रात्रीची वेळ साधून या ठिकाणी फायबर बोटिंच्या सहाय्याने बेकायदेशीर रित्या वाळू उपसा करीत असून चोरीच्या वाळूने भरलेले डंपर थेट दौंड शहरातूनच नेले जात आहेत. चोरीच्या वाळू ची वाहतूक होत आहे हे दिसू नये म्हणून मोठ्या डंपरचा वापर वाळू माफियांनी सुरू केला आहे. भीमा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा बंद झाला आहे असा विश्वास बसत असतानाच वाळू माफियांनी मोठ्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने आपला गोरख धंदा सुरू केला असल्याचे दिसू लागले आहे.

यावेळेस वाळू माफिया नेमके कोणाच्या आशीर्वादाने व भरवशावर नदीपात्रात उतरले आहेत यावर सर्वत्र उलट-सुलट चर्चा सुरू आहे. येथील महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला अंधारात ठेवून हा सर्व प्रकार चालू आहे की, ‘देखकर भी अंजान’… या उक्ती प्रमाणे हे सुरू आहे कि काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि संगणमत या संकल्पनेतून जर हा प्रकार सुरू झालेला नसेल तर महसूल विभाग व पोलीस प्रशासन वाळू माफियांनी सुरू केलेला नदीपात्रातील उच्छाद बंद पाडणार का? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago