दौंड येथे संभाजी महाराज पुतळा उभारणी आणि विकास कामांसाठी दीड कोटी मंजूर, खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

अख्तर काझी

दौंड – खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षीत यश आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील नगरपालिका व नगरपरिषदांसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे.

दौंड येथे संभाजी महाराजांचा पुतळा उभारणे आणि अन्य विकास कामांसाठी एक कोटी पन्नास लाख इतका निधी उपलब्ध झाला आहे. त्यासाठी खासदार सुळे यांनी अजित पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.

दौंड नगरपरिषदेस मिळालेल्या निधीतून प्रभाग क्र. ५ मध्ये छत्रपती संभाजी महाराज स्तंभ येथे त्यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. याशिवाय महात्मा फुले पुतळा परिसराचे सुशोभीकरण, प्रभाग क्रमांक १ मधील पानसरे वस्तीत सभामंडप उभारणे, प्रभाग क्र. ५ मध्ये हिंदू बेस्तर समाज बहुद्देशीय सभागृह उभारणे याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि प्रभाग क्रमांक ८ मधील सेंट सॅबिस्टीयन चर्च परिसरात लादीकरण करण्यात येणार असून रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. शिवाय सरपंच वस्ती येथे पोलीस चौकी देखील उभारण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.