Categories: मनोरंजन

रितेशच्या ‘या’ आगामी मराठी चित्रपटात पुन्हा दिसणार ‘सलमान खान’, आषाढी एकादशीनिमित्त ‘रितेश देशमुख’ ची मोठी घोषणा

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा सुपुत्र रितेश देशमुख (riteish deshmukh) याने आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा देताना आपल्या आगामी ‘वेड’ (ved) मराठी चित्रपटाचे (marathi movie) सलमान खान (salman khan) सोबत चित्रीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. लवकरच हा त्याचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘वेड’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आनंद लुटताना सलमान खान, रितेश देशमुख

रितेश देशमुख याने आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर घोषणा करताना म्हणाला की, पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे, अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो.

अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’. माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी ‘लईभारी’ साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक ‘वेड’ केलंय. थॅक्यु भाऊ, लव यू, तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला असल्याचे रितेशने म्हटले आहे.

‘वेड’ चित्रपटाच्या सेटवर सलमानला शूट दाखवताना रितेश

याबाबत रितेश देशमुख याने आपला चित्रपट लवकरच चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होत असल्याचे सांगून, हा चित्रपट कसा असणार आहे याबाबत माहिती देताना..

आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच… चित्रपटगृहात !! आपला, रितेश विलासराव देशमुख, असे म्हणून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे.

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago