कुरकुंभ : सोमवार दिनांक 03/11/2025 रोजी दौंड पोलिसांना कुरकुंभ गावच्या हद्दीत एक इसम चिकनच्या दुकानात गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यावेळी पोलिसांनी तेथे छापा मारला असता त्या ठिकाणी एक किलो गांजा आढळून आला आहे.

सलीम आदम शेख (वय 30 वर्ष व्यावसाय चिकन सेंटर रा. कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे) असे गांजा आढळून आलेल्या चिकन सेंटर मालकाचे नाव असून त्याच्या चिकन सेंटरमध्ये पोलिसांनी छापा मारला असता त्या ठिकाणी सदर इसम अवैधरित्या गांजाची विक्री करीत असल्याचे आढळून आले. आरोपी जवळून एकूण 20,745 रुपये किमतीचा एकूण 1 किलो 383 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला आहे. याबाबत संजय कोठावळे (पो.ह.) यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे, पोलीस हवालदार किरण पांढरे, अंतुल पठाण, राऊत, विजय पवार, संजय कोठावळे, महेंद्र गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.







