पुणे : २०१९ साली सुरू झालेल्या ‛सहकारनामा’ या वृत्तपत्र आणि त्याच्या न्यूज पोर्टलने अल्पावधीत वाचकांची विश्वासार्हता आणि मने जिंकत ३ ऱ्या वर्षात पदार्पण केले आहे. ‛सहकारनामा’ च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. रविवार दि.१६ जानेवारी २०२२ रोजी सकाळपासूनच पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी जाहिराती, व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर आणि फोनवरून शुभेच्छांचा वर्षाव केला.
‛सहकारनामा’ वृत्तपत्राचा दुसरा वर्धापनदिन हा गलांडवाडी (ता.दौंड) येथील कै.अनाजी खाडे अनाथ, निराधार बालकाश्रमात तेथील मुलांना जेवण देऊन साजरा करण्यात आला.
यावेळी दौंडचे आमदार राहुलदादा कुल, माजी आमदार रमेशआप्पा थोरात, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार सर, दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे सर, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस वैशालीताई नागवडे, न्यू अंबिका सांस्कृतिक कलाकेंद्राचे अशोक बाबा जाधव, रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे, हार्मोनि कंपनीचे मॅनेजर दीपक चौधरी, भीमा पाटस कारखाण्याचे संचालक आप्पासाहेब हंडाळ, दशरथभाऊ गरदडे, उमेश देवकर, समता परिषदेचे मा.अध्यक्ष संदीप भागवत, ऍड अझर मुलाणी, सरपंच अझर शेख, ऍड.गुंड, दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे मा.अध्यक्ष भानुदास नेवसे, खुटबावचे मा.सरपंच शिवाजी थोरात, प्रमोद निंबाळकर, शहाजी गायकवाड, केडगावचे मा.उपसरपंच बापू गायकवाड, शिक्षक संघाचे सदस्य कौले सर, खामगावचे सरपंच मदने, ग्राप सदस्य गणेश पांढरे, ग्राप सदस्य प्रवीण पिसे, मेमाणे, सूत्र संचालक प्रकाश देशमुख सर, पोलीस हवालदार थोरात, भोसले, बाबासाहेब शेळके, इसाकभाई शेख, तर कै.खाडे अनाथ बालकाश्रमातील अधीक्षक गोफने सर, बडे सर तसेच धाकले सर, हार्मोनि कंपनीचे जीवन सावंत सर हे प्रमुख पाहुणे आवर्जून उपस्थित होते.
यावेळी आमदार राहुल कुल यांनी ‛सहकारनामा’ द्वितीय वर्धापनदिनाला शुभेच्छा देताना या वृत्तपत्राने अल्पावधीत चांगली प्रगती करत आपले आगळे वेगळे वैशिष्ट्य जपले आहे. योग्य मांडणी आणि उत्कृष्ठ लिखाणाच्या जोरावर ‛सहकारनामा’ वृत्तपत्र व न्यूज पोर्टल यशस्वी घोडदौड करत असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. माजी आमदार रमेश थोरात यांनीही ‛सहकारनामा’ च्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देऊन वृत्तांची स्तुती करत खरे लिखाण करणारे ‛सहकारनामा’ असेच प्रगती राहील असा विश्वास व्यक्त केला.
महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे यांनीही ‛सहकारनामा’ हे सामान्य जनतेला न्याय देणारे वृत्तपत्र असून सहकारनामा ने जो अनाथाश्रम येथे जेवण देण्याचा उपक्रम राबवला आहे तो अतिशय स्तुत्य असल्याचे सांगून अन्य माध्यमांनीही असे उपक्रम राबवून समाजाप्रती आपली जागरुकता दाखवावी असे आवाहन केले.
यावेळी दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी ‛सहकारनामा’चे संपादक अब्बास शेख यांचे विशेष कौतुक करून ते समाजातील प्रत्येक घटना जगासमोर मांडताना आपली सामाजिक बांधिलकीही जपत असल्याचे म्हटले.
तर यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या या पोलिस तपासांमध्येही खूप महत्वाच्या भूमिका बजावत आहेत असे म्हणत एका बातमीमुळे आम्हाला अनेक बेवारस, अज्ञात व्यक्तींचा शोध लागल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सहकारनामा च्या सामाजिक उपक्रमाची स्तुती केली. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे, दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे मा.अध्यक्ष भानुदास नेवसे या मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
वर्धपनदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लोकशाही न्यूज चॅनेलचे विनोद गायकवाड, सामना वृत्तपत्राचे अमोल होले, पुण्यनगरीचे बापू नवले, दीपक चौधरी, जनप्रवास चे अलिम सय्यद, लोकसह्याद्री चे परशुराम निखळे, महाराष्ट्र भूमीचे अण्णा बारवकर, जर्नलिस्ट सौ.पूजा भोंडवे या पत्रकार बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी दौंड तालुका फोटोग्राफर संघाचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांनीही वर्धापनदिनानिमित्त संघटनेतर्फे सहकारनामा ला शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे संपूर्ण व्यवस्थापन हे रज्जाकभाई इनामदार, असिफभाई शेख, मुबारकभाई पठाण, समीर पठाण, मुन्ना सय्यद, झियान शेख यांनी पाहिले. मान्यवरांमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश दादा पासलकर व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सितारामजी लांडगे यांनी प्रकृती असवस्थामुळे कार्यक्रमाला येता न आल्याने व्हिडीओ संदेश देत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
‛सहकारनामा’ ने आपल्या निर्भीड बातम्यांचा माध्यमातून गेल्या ३ वर्षांमध्ये न्यूज पोर्टलवर ९८ लाख वाचक वर्ग तयार केला आहे असून पुणे जिल्हा तसेच जवळपासच्या जिल्ह्यातील वाचकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.
‛सहकारनामा’ च्या वर्धापनदिनानिमित्त राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, शैक्षणिक, उद्योग, व्यापार आदी क्षेत्रातील मान्यवरांनीही सोशल मीडियावरून मोठ्याप्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव केला.