Sahkarnama News Impact : कुरकुंभ मोरी समोरील खड्ड्याचा प्रश्न दौंड पोलिसांनी लावला मार्गी, दौंडकरांकडून पत्रकार व पोलीस प्रशासनाचे आभार



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे व  त्यामुळे शहरात रोज अपघात होत आहेत,  अशा आशयाची बातमी सर्वप्रथम ‛सहकारनामा’ने काल प्रसिद्ध केली होती. व हा विषय लावून  धरला होता त्या मुळे दौंड पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेत कुरकुंभ मोरी समोरील रस्त्यावरील वादग्रस्त खड्डा ठेकेदाराकडून बुजवून घेतला आहे. 

शहरातील कुरकुंभ मोरी समोरील रस्ता एका कंपनीने भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदलेला होता, केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही ठेकेदाराने खोदलेला रस्ता बुजवला नसल्याने या खड्ड्यामध्ये पडुन अनेक वाहन चालक जखमी होत होते.

अशी परिस्थिती पाहून सहकारनामा ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करत येथील झुंज मित्र मंडळाने या खड्ड्यात शेतातील बुजगावणे उभे केल्याचेही प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. या बातमीची तत्परतेने दखल  घेत दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सदर ठेकेदारास पोलीस स्टेशनला बोलवून चांगलेच खडसावले, व खड्डा पडलेला रस्ता ताबडतोब बुजविण्याच्या सूचना केल्या. 

ठेकेदारानेही लागलीच खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवला आहे. झुंज मित्र मंडळ व दौंडकर यांनी सहकारनामा व पत्रकार बांधवांचे तसेच पोलीस प्रशासनाचे आभार मानले.