Sahkarnama news impact : ‛सहकारनामा’ च्या बातमीचा मोठा इफेक्ट..कॅनॉलमध्ये रुग्णवाहिका वॉशिंग करण्यावर बसला ‛चाप’! पाटबंधारे विभागाकडून ‛हि’ कारवाई



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील  केडगाव-वाखारी येथे असणाऱ्या उजवा मुठा  कॅनॉलमध्ये ‛कोरोना’ रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका ‛धुवून’ ड्रायवर अंघोळ करत असल्याची बातमी ‛सहकारनामा’ ने काल प्रसिद्ध केली होती. 

या बातमीनंतर संबंधित खात्याने कडक पावले उचलत कठोर कारवाईला सुरुवात केली आहे.

पाटबंधारे विभागाने संबंधित ठिकाणी यंत्राच्या सहाय्याने चर घेऊन मोठमोठे दगड या ठिकाणी लावून या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी हि कारवाई केली आहे.

‛सहकारनामा’ च्या बेधडक बातमीचे नागरिकांनी स्वागत केले असून सहकारनामा ने सत्य परिस्थिती समोर आणल्याने पुढे होणारे दुष्परिणाम हे रोखले गेले असल्याचे अनेकांनी फोन करून सांगितले आहे.

नेमके त्या ठिकाणी काय घडत होते..

कोरोना तसेच विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या आजारी आणि मृत रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिका केडगाव – वाखारी जवळील खडकवासला  नवीन मुठा उजवा कालवा(कॅनॉल)च्या पाण्यामध्ये सर्रासपणे धुतल्या जात  होत्या तर अँबुलन्सवर असणारे ड्रायव्हरही त्याठिकाणी अंघोळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार सहकारनामा ने बातमीच्या माध्यमातून समोर आणला होता.

या ठिकाणी कॅनॉल च्या पाण्यात कोरोना रुग्ण, सामान्य आजाराने ग्रस्त रुग्ण तसेच मृत पावलेल्या रुग्णांच्या डेडबॉडीज पोहचवून आल्यानंतर हे अँबुलन्सवाले कॅनॉलच्या आत उतरण्याच्या रस्त्याने या अँबुलेन्स कॅनॉलमधील  स्वच्छ पाण्यामध्ये उतरवून त्यातील स्ट्रेचर व इतर साहित्य त्या पाण्यात घालून स्वच्छ करत होते तर या अँबुलेन्समधील पीपीई किट कॅनॉलच्या पाण्यामध्ये किंवा कॅनॉल लगत असणाऱ्या मोकळ्या जागेत फेकून देण्यात येत असल्याची गंभीर बाब उघड झाली होती.

सहकारनामा ने याबाबत बातमीतून आवाज उठवताच संबंधित खात्याने येथे आत जाणारा रस्ताच आज बंद केला आहे त्यामुळे यापुढे  आता येथील घडत असलेल्या भयानक प्रकाराला आता आळा बसणार आहे.