– सहकारनामा
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ होऊन संचारबंदीला अक्षरशा हरताळ फासण्यात येत होता. याबाबत ‛सहकारनामा’ ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासकीय यंत्रणांनी कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
केडगाव हे तालुक्यातील मुख्य गाव असून याची लोकसंख्या जवळपास 23 ते 24 हजारांच्या घरात पोहोचली आहे. येथे नागरिकांची ये जा जात असल्याने कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे येथे कडक अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली होती.
पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी नागरिकांना आवाहन करूनही नागरिक हवा तसा प्रतिसाद देत नव्हते त्यामुळे आज दि. 17 एप्रिल रोजी केडगाव ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी करत केडगावमधील रहदारीचे मुख्य रस्ते बंद केले आहेत.
त्यामुळे आता गरज नसताना फिरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. अशीच कडक अंमलबजावणी झाल्यास कोरोना चेन ब्रेक करण्यात नक्कीच यश येईल असे जाणकारांचे मत आहे.