Sad News – बाळासाहेब उर्फ प्रकाश गायकवाड यांचे दुःखद निधन



– सहकारनामा

दौंड : 

केडगाव ता.दौंड येथील जेष्ठ नागरिक बाळासाहेब उर्फ प्रकाश विठ्ठल गायकवाड यांचे आज शुक्रवार दि.9 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 च्या सुमारास दुःखद निधन झाले ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा मोठा परिवार आहे.

बाळासाहेब गायकवाड हे सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे व्यक्तीमत्व होते. गावासाठी सरकारी नोकरी डावलून त्यांनी गावातच सामाजिक कार्यात मग्न राहण्याचा निर्धार केला होता आणि त्यांनी त्यातच आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. त्यांनी केडगाव येथील बालाजी पतसंस्थेत सचिव म्हणूनही कार्यरत होते.

बाळासो गायकवाड यांच्या जाण्याने केडगाव गावामध्ये शोककळा पसरली आहे. केडगाव पंचक्रोशीतील मान्यवरांनी बाळासाहेब गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.