नवी दिल्ली –
भारतरत्न माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी सायंकाळी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना दिल्लीतील आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकतेच प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती.
प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या मृत्यूची माहिती ट्विट करून दिली.
प्रणव मुखर्जी हे कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आणि नुकतीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली होती. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडल्यामुळे 10 ऑगस्टला त्यांना दिल्लीतील आरआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानंतर ही शस्त्रक्रिया केली गेली, त्याच वेळी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचेही सांगण्यात आले.
गेल्या कित्येक दिवसांपासून मोठे डॉक्टर त्यांच्यावर नजर ठेवून होते, परंतु त्यांची तब्येत सतत खालावत गेली. त्यानंतर त्यांनी आज सोमवारी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी 2012 सालापर्यंत ते राष्ट्रपती होते. सन 2019 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त करताना, प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे संपूर्ण देश दु: खी आहे, ते एक चांगले राजकारणी होते. ज्याने राजकीय क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रातील प्रत्येक विभागात सेवा केली आहे. प्रणव मुखर्जी यांनी राजकीय कारकीर्दीत आर्थिक आणि सामरिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. ते एक हुशार खासदार होते ज्यांनी नेहमीच पूर्ण तयारीने प्रतिसाद दिला असे शेवटी त्यांनी आपली भावना व्यक्त केली.