Categories: Previos News

Sad News : गणेश विसर्जन करताना वाहून गेलेल्या ‛त्या’ मुलाचा मृतदेह ‛देलवडी’ जवळ सापडला



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख) 

गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या राहू (ता.दौंड) गावातील त्या युवकाचा मृतदेह देलवडी जवळ भीमा नदी पात्रामध्ये काही वेळापूर्वी आढळून आला आहे. त्यामुळे वाहून गेलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याचे आता शिक्कामोर्तब झाले आहे. या घटनेमुळे राहू गावावर शोककळा पसरली आहे. 

गणेश विसर्जनाच्या दिवशी राहू येथे नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करायला गेलेला दुर्गेश पंडित हा 17 वर्षीय  मुलगा मूर्ती विसर्जन करताना पाण्यात वाहून गेला होता. तो वाहून जात आहे हे पाहून तेथील सर्प मित्राने वाहत्या पाण्यात उडी मारून त्यास वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने आणि अंधार पडल्याने त्याला बाहेर काढण्यात यश आले नव्हते.

दुर्गेश पंडित यास शोधण्यासाठी राहू चे  ग्रामस्थ आणि मुळशी अपत्कालीन समितीच्या जवानांनी त्याचा बोटीच्या साहाय्याने दोन दिवस शोध घेत होते मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. आज गुरुवारी सायंकाळी त्याचा मृतदेह नदीत वाहत असल्याचे देलवडीतील काही ग्रामस्थांना दिसले आणि त्यांनी याबाबत राहू चे ग्रामस्थ तसेच राहू चे

पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांना याबाबत माहिती दिली. या सर्वांनी देलवडी येथे शेलारांची मळई या ठिकाणी जाऊन पाहिले असता तो मृतदेह दुर्गेश पंडित या मुलाचा असल्याचे त्यांनी ओळखले. 

सध्या या घटनेमुळे राहू गावामध्ये शोककळा पसरली असून दुर्गेश याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असूनही त्यांनी मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत घेतली होती मात्र या मुलाचे असे निधन झाल्याने सध्या पंडित परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago