| सहकारनामा |
दौंड : दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्या मातोश्री चतुराबाई डांगे यांचे दुःखद निधन झाले. आज गुरुवार दि.29 एप्रिल 2021 रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्या मतोश्रींची तब्येत खालावली असतानाही या आणीबाणीच्या काळात डॉ. डांगे यांनी आपले दौंड उपजिल्हा रुग्णालयातील कर्तव्य पार पाडण्याला महत्व देत कुठलीही रजा न घेता दौंडमधील कोविड रुग्णांवर उपचार करण्याला प्राधान्य दिल हे विशेष आहे.