दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार या पदावर कार्यरत असणारे शिवाजी नामदेव मारकड या पोलीस हवालदारांचे कोरोनाशी लढताना दुःखद निधन झाले.
एक महिना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये मारकड यांची कोरोनाशी झुंज सुरू होती मात्र रात्री त्यांची झुंज अपयशी होऊन त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवाजी मारकड हे मनमिळाऊ, एक उमदे आणि चांगले व्यक्तिमत्व होते. त्यांना कायदे आणि प्रशासनाचीउत्तम जाण असल्याने त्यांची कामगिरी उत्कृष्ठ होती.
हवालदार मारकड यांच्या निधनाची बातमी समजताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांसह सर्वच पोलीस स्टाफने त्यांना साश्रु नयनांनी श्रद्धांजली वाहिली. कोरोना महामारी विरुद्ध लढताना आणि आपले कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले मारकड हवालदारांना ‛सहकारनामा’ तर्फेही भावपूर्ण श्रद्धांजली.