Categories: Previos News

Sad News – कायम दुसऱ्यांना हसवणाऱ्या नाना हंडाळ या पोलीस कर्मचाऱ्याचे निधन, केडगावसह पोलीस दलात खळबळ



पुणे : सहकारनामा

कायम दुसऱ्यांना खळखळून हसवणाऱ्या, दुसऱ्याचे दुःख स्वतःचे समजून त्याला धीर देणाऱ्या आणि पोलीस नाईक असूनही सामाजिक कार्यात कायम स्वतःला झोकून देणाऱ्या नाना हंडाळ (सध्या रा. शिवाजी नगर पोलीस लाईन, गावाचा पत्ता- केडगाव ता.दौंड) या पुणे शहर पोलीस कर्मचाऱ्याचे आज निधन झाले.

नाना हंडाळ हे पुणे शहर बंडगार्डन पोलीस ठाण्यात पोलीस नाईक या पदावर कार्यरत होते. त्यांनी आज पोलीस लाईनमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

नाना हंडाळ यांचे  दौंड तालुक्यातील केडगाव हे गाव असून त्यांना या गावात मोठा मान होता. कायम हसरा चेहरा आणि दिलखुलास व्यक्तिमत्व हि त्यांची ओळख होती.

त्यांच्या आत्महत्येप्रकरणी  शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नाना हंडाळ हे सध्या शिवाजीनगर पोलीस लाईनममधील डी इमारतीत राहत होते.

नाना हंडाळ यांच्या अचानक जाण्याने केडगाववर शोककळा पसरली असून सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी शहरातील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Sahkarnama

Recent Posts

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

12 तास ago

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

1 दिवस ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

2 दिवस ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

2 दिवस ago

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

3 दिवस ago