Sad News : दौंडचे माजी नगरसेवक फिरोज उर्फ पापाभाई पठाण यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन



|सहकारनामा|

दौंड : काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता अशी ओळख असलेले माजी नगरसेवक फिरोज उर्फ पापा इस्माईल पठाण (वय54) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व दोन मुलगे असा परिवार आहे. दलित पँथरच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीमध्ये ते नेहमी अग्रेसर असत. नंतर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाशी नेहमी एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. 

युवक काँग्रेसचे दौंड शहर अध्यक्ष तसेच पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे दौंड तालुका अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर नगरसेवक पदाची निवडणूक सुद्धा त्यांनी जिंकली होती. दौंड नगर पालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी कारकीर्द गाजविली. 

शहरातील मोटर सायकल शर्यती जिंकल्याने रायडर म्हणूनही त्यांची ओळख होती. विद्यमान नगरसेवक शहानवाज पठाण त्यांचे पुतणे होत.