Sad News – कठीण परिस्थितीची जाण ठेऊन मुलांना घडविणाऱ्या हिराबाई जाधव कालवश



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राचे मालक, महाराष्ट्र राज्य परीक्षा निरीक्षण मंडळाचे सदस्य व महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोकबाबा जाधव यांच्या मातोश्री हिराबाई बाबूराव जाधव यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. 

कठीण परिस्थितीमध्ये मुलांना वाढवून त्यांना संस्कार देऊन एक यशस्वी उद्योजक बनविण्यात हिराबाई जाधव यांचा मोठा वाटा होता. 

हिराबाई जाधव या वृद्धपकाळात पुणे येथील निवासस्थानी वास्तव्यास होत्या. 

कलाक्षेत्राची विशेष आवड होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण जाधव परिवार शोकमग्न झाले आहे.