Sad News : केडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कबीर पठाण यांचे हृदय विकाराने निधन



दौंड : सहकारनामा

केडगाव ता.दौंड येथील सामाजिक कार्यकर्ते कबीर इमाम पठाण यांचे आज दि.16 मार्च 2021 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

कबीर पठाण हे केडगाव येथील चांद तारा मस्जिदचे ट्रस्टी होते. कबीर पठाण यांनी समाजासाठी आपले योगदान देताना चाँद तारा मस्जिद वॉल कंपाउंड, मस्जिद सुशोभीकरण तसेच ईदगाह कामामध्ये विशेष योगदान दिले होते.

त्यांच्या निधनाची खबर समजताच केडगाव गावठाणामध्ये शोककळा पसरली होती. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, आई असा मोठा परिवार आहे.