दौंड : सहकारनामा
दौंडचे आमदार राहुल कुल यांचे अत्यंत विश्वासु सहकारी रावनगाव येथील माजी सरपंच आणि भीमा पाटस कारखान्याचे विद्यमान संचालक विनोद गाढवे यांचे काल सायंकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
रावनगाव चे सरपंच, बाजार समितीचे संचालक ते भीमा पाटस कारखान्याचे संचालक असा त्यांचा राजकीय प्रवास होता.
गेल्या पंधरा दिवसांपासून ते पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात पित्ताशयाच्या आजारावर उपचार घेत होते. काल त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. मात्र काल सायंकाळी त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
विनोद गाढवे यांची प्रकृती खालावली असल्याची खबर मिळताच आमदार कुल यांनी पुण्यातील रुग्णालयात धाव घेत तेथेच थांबून होते. डॉक्टरांनी गाढवे यांना मृत घोषित करताच कुल यांनाही अश्रू अनावर झाले.