सचिन शिंदे याचा ‛खून’ करून जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींना घातक शस्त्रांसह ‛अटक’

पुणे : लोणीकंद भागात गोल्डमॅन अशी ओळख असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन शिंदे याचा फेब्रुवारी 2021 मध्ये गोळ्या घालून खुन करणारे आरोपी हे काही दिवसांपूर्वी जामीनावर बाहेर आले असून ते गुन्ह्यातील साक्षीदारांना घातक शस्त्रे दाखवून दहशत निर्माण करत आहेत अशी माहिती गुन्हे शाखा युनिट 6 पुणे शहरचे पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे व ऋषिकेश व्यवहारे यांना मिळाली होती. हे आरोपी नजिकच्या काळात गंभिर गुन्हा करण्याचे प्रयत्नात आहेत अशी गोपनीय माहीती प्राप्त झाल्याने त्या अनुषंगाने ऋषिकेश ताकवणे व ऋषिकेश व्यवहारे यांनी नमुद आरोपीवर
नियमीत पाळत ठेवली होती.

दिनांक 10 नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा, युनिट-6 कडील पोलीस आधिकारी व अंमलदार हे गस्त घालत असताना पो.ना.रमेश मेमाणे यांना माहिती मिळाली की, सचिन शिंदे याच्या खुनाच्या गुन्हयातील आरोपी शिवाजीनगर न्यायालयामध्ये तारखेला आलेले आहेत व त्यांच्या जवळ घातक शस्त्रे आहेत. याबाबत गुन्हे शाखा, युनिट 6 चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांना माहिती दिली असता श्री गणेश माने, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट 6, पुणे शहर यांनी पथकासह कामगार पूतळा, शिवाजीनगर न्यायालयाजवळ, पुणे याठिकाणी सापळा रचून आरोपी जात असलेल्या स्कार्पिओ गाडीस थांबवून त्यांच्याकडे विचारपूस केली.

यावेळी आरोपी 1) प्रथमेश ऊर्फ सनी कुमार शिंदे (वय-21 वर्षे रा. मु.पो.लोणीकंद शिंदेवस्ती, ता.हवेली जि.पुणे. असे सांगून स्कॉरपिओ चालकाने 2) गणेश दिनकर दाते, (वय-30 वर्षे, रा.मु.पो.सोनेसांगवी, दातेमळा, ता.शिरुर जि.पुणे) 3) ऋतिक (वय 19 वर्षे रा.मु.पो. लोणीकंद, गणेश मंदिराचे मागे, ता.हवेली जि.पुणे) 4) रोहित दत्ता मंजूळे (वय 19 वर्षे रा. वाघेश्वरनगर वाघोली ता. हवेली जि.पुणे) 5) आकाश राजू दंडगुले वय 20 वर्षे ,रा.सदर) 6) अदित्य राजाराम डफळ वय 21 वर्षे रा.मु.पो. धामारी गोकूळनगर ता. शिरुर जि.पुणे) 7) मनोज लक्ष्मण साळवे, (वय 31 वर्षे, रा.इंद्रायणीनगर, राजवाडा बिल्डींग नं.8 रुम नं.2.भोसरी पुणे) यांची पोलीसांनी पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्टल, एक जिवंत काडतूस, दोन कोयते, दोन लाकडी दांडके असा मुद्देमाल मिळून आला. त्यामुळे या सर्व आरोपींविरुध्द शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त, पुणे शहर, डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे.पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे शाखा,पुणे शहर, लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सपोनि नरेंद्र
पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ
कारखेले, नितीन शिंदे, रमेश गेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर व काळूराम शिवले यांनी केली आहे.