रशियाची राजधानी मॉस्कोमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मॉस्को येथील एका शॉपिंग मॉलमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. रशियन सैनिकांची वर्दी घातलेल्या हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या हल्ल्यात 140 जणांचा मृत्यू झाला अलण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची संख्या साधारण पाच ते सहा अशी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मॉस्को च्या एका मॉलमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान सैनिकांच्या वर्दीत असणाऱ्या हल्लेखोरांनी गोळीबार करण्यास सुरवात केली. या गोळीबारात अनेक लोक मृत्यूमुखी पडले तर शेकडो जखमी झाले आहेत. हा हल्ला कुणी केला याचा शोध रशियन सरकार घेत आहे. युक्रेन ने या हल्ल्यापासून स्वतःला अलिप्त ठेवले असून आपण हा हल्ला केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.