भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनले ब्रिटनचे नवे पंतप्रधान! लवकरच शपथ घेणार

नवी दिल्ली : (विशेष प्रतिनिधी) भारतीय वंशाचे असणारे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले असून त्यांनी इतिहास रचला आहे. पीएम शर्यतीत असलेल्या पेनी मॉर्डंट शर्यतीत मागे पडल्यानंतर त्यांनी आपला पंतप्रधान पदाचा दावा मागे घेतला आहे. त्यानंतर ऋषी सुनक हे पंतप्रधान झाल्याचे जाहीर झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेऊ शकतात आणि 29 ऑक्टोबरला सुनक यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते. सुनक हे इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत सुनक यांना संसदेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ कॉमन्सचे नेते पेनी मॉर्डंट यांच्याकडून कडवी स्पर्धा होती. या संदर्भात, पेनीच्या प्रवक्त्याने सोमवारी सकाळी दावा केला होता की पेनीमॉर्डेंट सोमवारी दुपारपर्यंत सर्व मित्रपक्षांशी बोलून आवश्यक संख्या गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र यात त्यांना यश आले नाही त्यामुळे त्यांनी माघार घेतल्याने आता ऋषी सुनक हे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.