Categories: Previos News

रेल्वेच्या ‛ई’ तिकिटांची बेकायदेशीरपणे विक्री करणारा RPF च्या जाळ्यात, दौंडमध्ये कारवाई झाल्याने खळबळ



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

रेल्वेच्या इ तिकिटांची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या एकास रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या CIB पथकाने कुरकुंभ येथून ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. 

संजय ज्ञानदेव मचाले(वय 27,रा. जिरेगाव, ता. दौंड) असे  अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेबाबत दौंड RPF ने दिलेली माहिती अशी की, सोलापूर विभागातील CIB पथकाला कुरकुंभ या ठिकाणी रेल्वे प्रवासाच्या E तिकिटांची बेकायदेशीरपणे विक्री होत असल्याची खबर मिळाली, त्या नुसार पथकाने कुरकुंभ येथील संजय इंटरप्राईजेस या दुकानावर छापा टाकला असता संजय मचाले हा बेकायदेशीरपणे E तिकिटांच्या विक्रीचा व्यवसाय करीत असताना आढळून आला आहे. 

पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्याकडील एक मोबाईल फोन,लॅपटॉप तसेच 1 लाख 1 हजार 349 रुपयांचे 129 E तिकीट असा मुद्देमाल जप्त केला आहे. मचाले हा कुरकुंभ MIDC मध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय प्रवाशांकडून जास्तीची रक्कम घेऊन त्यांना बेकायदेशीर पणे रेल्वेची तिकिटे विक्री करीत असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

संजय मचाले याच्या विरोधात रेल्वे कायदा 143 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई साठी त्याला दौंड RPF यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास दौंड RPF चे पोलीस उपनिरीक्षक सुनील यादव करीत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

11 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago